Anuradha Vipat
रात्री घराची खिडकी उघडी न ठेवण्यामागे केवळ धार्मिक नाहीत तर वैज्ञानिक आणि व्यावहारिक कारणे देखील आहेत.
रात्रीच्या वेळी दिवे सुरू असताना खिडक्या उघड्या राहिल्यास डास, कीटक आणि रात्रीचे पतंग मोठ्या प्रमाणावर घरात येतात.
खिडकी उघडी असल्यास बाहेरील थंड हवा, धूळ आणि परागकण थेट नाकात गेल्यामुळे अस्थमा किंवा सायनसचा त्रास असलेल्यांना श्वास घेण्यास अडथळा येऊ शकतो
चोऱ्या किंवा अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी खिडक्यांना मजबूत जाळी किंवा ग्रील्स असणे आणि त्या रात्री बंद करणे आवश्यक आहे.
वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर वातावरणात नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो असे मानले जाते.
रात्री खिडक्या उघड्या ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि बाहेरची नकारात्मकता घरात प्रवेश करू शकते.
वास्तुशास्त्र आणि आरोग्याच्या दृष्टीने खिडकीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.