Anuradha Vipat
कोणतंही शुभ कार्य असो नारळ फोडणं हे शास्त्रचं असतं. प्रत्येक धार्मिक विधीमध्ये नारळ फोडणं अनिवार्य असते.
पण तुम्हाला माहिती आहे का कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडूनचं का करतात? चला पाहूयात.
प्रत्येक शुभ कार्यक्रमात नारळाचा वापर केला जातो नारळाला श्रीफळ म्हणजे देवांचे आवडते फळ असेही म्हणतात.
नारळाचा वरील कठीण भाग हा अहंकाराचे प्रतीक मानला जातो
नारळाचा आतील पांढरा आणि मऊ भाग शांततेचे प्रतीक मानला जातो
नारळाच्या पृष्ठभागावर तीन खुणा असतात. या खुणांना भगवान शंकराचे तीन डोळे मानले जाते.
नारळ फोडल्याने शुभ कार्य कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होते.