Anuradha Vipat
काही वस्तूंचे दान केल्याने सकारात्मक ऐवजी नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि घरातून लक्ष्मी निघून जाऊ शकते असे मानले जाते.
फाटलेली वस्त्रे दान केल्याने घरात दरिद्रता येते आणि राहू दोषाचा सामना करावा लागू शकतो.
अन्न शिजवण्यासाठी वापरलेले तेल किंवा खराब झालेले तेल कधीही दान करू नये. यामुळे शनी देवाचा कोप होतो.
चाकू, कात्री, सुरी यांसारख्या धारदार वस्तूंचे दान केल्याने घरातील शांती भंग होते
प्लॅस्टिकच्या वस्तू आणि स्टीलची भांडी दान करणे प्रगतीमध्ये अडथळे आणू शकते असे मानले जाते.
झाडू दान केल्याने किंवा कोणाला दिल्याने घरातील पैसा टिकत नाही आणि आर्थिक नुकसान होते.
असे मानले जाते की घड्याळ दिल्याने तुमची 'चांगली वेळ' देखील दुसऱ्याकडे जाऊ शकते.