Anuradha Vipat
गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन आपल्या घरात सुख, समृद्धी आणि मांगल्याची उधळण घेऊन येते.
ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, गणपती स्थापनेच्या पवित्र मुहूर्तावर काही विशेष सोपे तोडगे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते.
गणपती स्थापनेच्या दिवशी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना कुंकवाने किंवा सिंदूराने स्वस्तिक काढा. तसेच प्रवेशद्वाराला आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावा.
गणपतीची मूर्ती स्थापित केल्यानंतर पूजेमध्ये बाप्पाला २१ दुर्वांची जोडी आणि शमीची पाने अर्पण करा.
गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ५ किंवा ११ पिवळ्या कोड्या आणि थोडी अखंड अक्षता ठेवा.
गणपती स्थापनेच्या पूजेमध्ये एक अखंड पाण्याचा नारळ कलश किंवा बाप्पाच्या उजव्या बाजूला स्थापित करा. तसेच बाप्पाला त्याच्या आवडीच्या २१ मोदकांचा किंवा बुंदीच्या लाडूंचा नैवेद्य दाखवा.
जर तुमच्या घरात दक्षिणवर्ती शंख असेल, तर गणपती स्थापनेच्या दिवशी त्याची पूजा करा आणि त्यात गंगाजल भरून ठेवा.