Anuradha Vipat
काही घरगुती उपाय आणि जीवनशैलीतील बदल दमा नियंत्रणात ठेवण्यास आणि दम्यावर आराम मिळवून देण्यास मदत करू शकतात.
१ चमचा मध रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात किंवा आल्याच्या रसात मिसळून घ्यावा.
आल्याचा रस, मध आणि तुळशीचा रस एकत्र करून सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
तुळशीची पाने श्वसनसंस्थेसाठी अत्यंत गुणकारी मानली जातात.
लसूण छातीतील कफ साफ करण्यासाठी २-३ लसूण पाकळ्या दुधात उकळून प्याल्यास आराम मिळतो.
ओव्याची वाफ घेणे किंवा ओवा गरम पाण्यात उकळून ते पाणी पिणे फायदेशीर ठरते.
नियमित व्यायाम आणि योगासने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवतात आणि श्वासोच्छ्वास सुधारतात.