Aslam Abdul Shanedivan
अश्वगंधा ही झुडूपवर्गीय वनस्पती भारतात सर्वत्र आढळते. याच्या फांद्यावर तांबूस लव असते.
अश्वगंधामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आठ अल्कालॉइडस आढळून येतात. ज्यांपैकी इथेनीन, विथाफेरीन आणि सोमनीफेरीन ही अत्यंत महत्त्वाची आहेत.
या वनस्पतीची मुळे, पाने, हिरवी फळे, बिया औषधासाठी महत्त्वाच्या आहेत.
ही वनस्पती शरीराला पुष्टी देणारी, वात, क्षय, दमा, खोकला, कृमी यांचा नाश करणारी आहे.
मुळाची भुकटी शक्तिवर्धक असते. मुळांचा उपयोग शारीरिक कमजोरी कमी करण्यासाठी, संधिवात, धातुविकार, विर्यवृध्दी, चर्मरोग व अपचनासाठी केला जातो.
फळाची भुकटी लहानापासून वयोवृद्धांपर्यंत उत्तम प्रकारचे टॉनिक आहे. उचकी, त्वचारोग, उच्च रक्तदाब, मूळव्याधीवर गुणकारी आहे.
अश्वगंधाचा उपयोगी शांत झोप येण्यासह पानांचा उपयोग रक्तस्रावावर केला जातो. मूत्र विकारावर याची फळे उपयोगी आहेत.