Team Agrowon
उन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी उत्तम असून, या काळात मुगाचे चांगले उत्पादन मिळू शकते.
पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी रब्बी हंगामातील पिकानंतर उन्हाळी मूग लागवड फायदेशीर ठरते.
मूग पीक साधारण ६० ते ६५ दिवसांत पक्व होते. या काळात पाण्याच्या किमान ५ ते ६ पाळ्या देणे गरजेचे आहे.
पेरणी फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिला पंधरवडा या काळात करावी.
पेरणी तिफणीच्या साह्याने करावी. दोन ओळींत ३० सेंमी आणि दोन रोपांत १० सेंमी ठेवावे.
उन्हाळी हंगामासाठी शिफारशीत सुधारीत वाणांची निवड करावी.
एकरी ५ ते ६ किलो बियाणे पुरेसे आहे. घरचे बियाणे वापरल्यास दर ३ वर्षांनी त्यात बदल करावा.