Ashok Saraf : अशोक सराफांचा पहिला चित्रपट ते महाराष्ट्र भूषणपर्यंतचा प्रवास...

sandeep Shirguppe

अशोक सराफ महाराष्ट्र भूषण

मनोरंजन विश्व गाजवणारे अशोक सराफ यांना २०२३ वर्षाचा मानाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली.

Ashok Saraf | agrowon

अभिनयाचा बादशाह

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवले.

Ashok Saraf | agrowon

आजही रंगमंचावर

वयाची ७५ ओलांडली तरीही अशोक सराफ आजही विविध माध्यमांमधून लोकांचं मनोरंजन करतात.

Ashok Saraf | agrowon

अशोक मामांचा पहिला चित्रपट

कला क्षेत्रात पाऊल टाकताना अशोक मामांचा पहिला चित्रपट कोणता होता आणि त्यांना काम कसं मिळालं असेल याबाबत जाणून घ्या.

Ashok Saraf | agrowon

स्टेट बँकेची नोकरी

अशोक सराफ लहानपणापासूनच रंगभूमीवर सक्रीय होते. रंगभूमीवर काम करताना अशोक मामांना स्टेट बँकेच्या नोकरीची ऑफर आली.

Ashok Saraf | agrowon

बँकेत नोकरी करत नाटक

आंतरबँक एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी पहिलं पारितोषिक पटकावलं. पुढे अशोकमामा नोकरी सांभाळत सांभाळत नाटकं करु लागले.

Ashok Saraf | agrowon

दोन्ही घरचा पाहुणा

पुढे एका नाटकासाठी प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळत असताना गजानन जहागीरदार यांनी 'दोन्ही घरचा पाहुणा' सिनेमासाठी अशोकमामांची निवड केली.

Ashok Saraf | agrowon

पहिला सिनेमा

अशाप्रकारे अशोक सराफ यांना आयुष्यातला पहिला सिनेमा मिळाला. त्यावेळी सात दिवसांच्या कामासाठी मामांना ५०० रुपये मिळाले होते.

Ashok Saraf | agrowon

महाराष्ट्र भूषण मिळाल्यावर अशोक मामा म्हणतात

मला कल्पना नव्हती मला हा पुरस्कार मिळेल. मी कुठेतरी चांगलं काम करतोय. माझी आतापर्यंतची धडपड सार्थकी लागली.

Ashok Saraf | agrowon

हे माझं यश नाही तर

मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं. हे यश माझं नाही तर माझ्या सहकाऱ्यांचंही आहे. या यशात निवेदिता माझ्यासोबत होती.

Ashok Saraf | agrowon