McDonald's Burger : मॅकडॉनल्ड'च्या बर्गरमधून टोमॅटो झाला गायब ; कंपनीने सांगितले कारण

Mahesh Gaikwad

मुसळधार पाऊस

हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.

Tomato Rate | Agrowon

वाहतूक व्यवस्था

वाहतूक व्यवस्था कोलमडल्यामुळे या राज्यातील टोमॅटोचे किरकोळ बाजारातील दर ८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.

Tomato Rate | Agrowon

टोमॅटोचे दर

टोमॅटोचे दर वाढल्यामुळे गृहिणींचे बजेटही कोलमडले आहे. परिणामी बाजारात टोमॅटो खरेदी करताना ग्राहक हात आखडता घेताना दिसत आहेत.

Tomato Rate | Agrowon

टोमॅटोचा वापर बंद

या पार्श्वभूमीवर उत्तर भारतातील मॅकडॉनल्डच्या अनेक स्टोर्समध्ये टोमॅटोचा वापर बंद करण्यात आला आहे.

McDonald's Burger | Agrowon

बर्गरमधून टोमॅटो गायब

टोमॅटोच्या वाढलेल्या दरांमुळे मॅकडॉनल्डच्या बर्गरमधून टोमॅटो गायब झाल्याचे चित्र आहे. टोमॅटोचे वाढलेल्या दरांमुळे हा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले आहे.

McDonald's Burger | Agrowon

किरकोळ बाजारातील दर

जुलैच्या पहिल्या आठवड्यात टोमॅटोचे दर ५५ रुपये किलोवर पोहोचले होते, जे महिनाभरापूर्वी ३५ रुपये किलो होते.

McDonald's Burger | Agrowon

टोमॅटो पुरवठा

कमी पुरवठा, वाढलेले दर आणि खराब दर्जामुळे उत्तर भारतातील काही स्टोर्समध्ये टोमॅटोचा वापर तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

Tomato Rate | Agrowon

टोमॅटोचा दर्जा

हिमाचल प्रदेशात झालेल्या मुसळधार पाऊस आणि पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे.

Tomato Rate | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....