Dry Fish : सुक्या मासळीचे दर का वाढले?

Team Agrowon

सुकी मासळी

कोकणातील ग्रामीणसह शहरी भागात ओल्या आणि सुक्या मासळीला मोठी मागणी असते.

Dry Fish | Agrowon

मासेमारी

सध्या मात्र समुद्रात मासेच कमी मिळत असून मागणी वाढल्याने सुक्या मासळीच्या दरातही वाढ झाली आहे.

Dry Fish | Agrowon

सुके सोडे

सर्वाधिक मागणी असलेल्या सुक्या सोड्यांचा दर प्रतिकिलो अडिच ते तीन हजारांवर पोहोचला आहे.

Dry Fish | Agrowon

सुकी मासळी बाजार

बुरोंडी, हर्णे बंदरावरील सुक्या मासळीसह अलिबाग आणि गुजरातमधील कोलीमही रत्नागिरीच्या बाजारात येत आहे.

Dry Fish | Agrowon

खारा मासा

सध्या चाकरमान्यांकडून चेवना, कोळंबी, बोंबील आणि खारा माशांना मागणी वाढली आहे.

Dry Fish | Agrowon

मासळी खरेदी

एप्रिल, मे महिना संपत आल्यानंतर मांसाहारी खवय्यांची अडचण होते. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक आठवडा बाजारात सुकी मासळी खरेदी करताना दिसत आहे.

Dry Fish | Agrowon

मासळी पॅकिंग

चांगल्या प्रतीची सुकी मासळी पॅकिंग करून विकली जाते. त्यात सुके बोंबील, चेवना, बारीक कोलीम, ढोमी, मांदेली, सुरमई, शिंगटा, मुशी, वागळी आदींचा समावेश आहे.

Dry Fish | Agrowon

सोडे, कोलीम

सुक्या मासळीच्या दुकानात मासळी घेतली तर ती कमी-अधिक दरात पॅकिंगमध्ये मिळते. सोडे व कोलीम यामध्ये व्यावसायिकांकडून दर्जा राखला आहे.

Dry Fish | Agrowon