Anuradha Vipat
संधीवात आणि पायांवर येणारी सूज कमी करण्यासाठी योगा आणि काही घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.
खुर्चीवर किंवा जमिनीवर बसून पायाची बोटे हळूहळू वाकवणे आणि सरळ करणे. तसेच घोटे गोलाकार फिरवा.
उभे राहून टाचा वर उचलल्याने पायांच्या नसा ताणल्या जातात आणि सूज कमी होण्यास मदत होते.
भिंतीला टेकून पाय वर करून १०-१५ मिनिटे झोपल्याने पायांमधील साठलेले द्रव खाली येते आणि सूज झटकन उतरते.
हे आसन सांध्यांमधील कडकपणा कमी करण्यासाठी उत्तम आहे.
टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडे एप्सम सॉल्ट किंवा खडे मीठ टाका. त्यात १५-२० मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने वेदना आणि सूज कमी होते.
कोमट मोहरीचे तेल पायाला हलक्या हाताने खालून वरच्या दिशेला मालिश करा.