Roshan Talape
सतत हातपाय दुखत असल्यास ते साधा थकवा नसून आरोग्याच्या समस्येचे लक्षण असू शकते.
खूप दिवसांचा मानसिक ताण शरीरात थकवा, जडपणा आणि वेदना निर्माण करू शकतो.
सतत हातपाय दुखण्यामागे संधिवात, मायालजिया किंवा मेंदू-संबंधित विकार कारणीभूत असू शकतात.
शरीरात पाणी आणि मिनरल्स (पोटॅशियम, मॅग्नेशियम) कमी असल्यास स्नायूंना आकडी येते आणि वेदना होतात.
व्हिटॅमिन डी, बी१२ आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरातील स्नायू आणि हाडांमध्ये वेदना होऊ शकतात.
दिवसभर बसून राहणे, व्यायाम न करणे आणि चुकीच्या झोपेच्या सवयीमुळे हातपाय दुखू लागतात.
थायरॉईड असंतुलन किंवा मधुमेह नियंत्रणात नसल्यास स्नायूंमध्ये वेदना आणि अशक्तपणा जाणवतो.
संतुलित आहार, नियमित व्यायाम, वैद्यकीय तपासणी आणि मानसिक शांततेमुळे अशा वेदनांवर नियंत्रण ठेवता येते.