Roshan Talape
पान मसाल्यातील सुपारी थोडी खाल्ल्यास पचनास मदत होते, पण जास्त खाल्ल्यास तोंडाचा कर्करोग होऊ शकतो.
पानात वापरला जाणारा चुना हाडांना बळकटी देतो, पण जास्त वापरल्यास तोंड दुखू लागते आणि जळजळ होते.
तसेच पानातील जायफळ तोंडाला सुगंध देते आणि मन शांत करते, पण जास्त घेतल्यास ते नुकसान करू शकते.
पान मसाल्यातील लवंग तोंडातील जंतू मारते, पण वारंवार चघळल्यास हिरड्यांना त्रास होऊ शकतो.
पानात वापरलेले गुलकंद पचनासाठी उपयुक्त असले तरी त्यातील साखर मधुमेहींसाठी हानिकारक ठरू शकते.
पान मसाल्यातील इलायची तोंडातील दुर्गंधी दूर करते, पण अतीप्रमाणात सेवन केल्यास अॅसिडिटी होऊ शकते.
पान मसाल्यात वापरली जाणारी कात तोंडाला गारवा देतो, परंतु अति वापरामुळे हिरड्या काळवंडतात.
पान मसाल्यातील तंबाखूमुळे तात्पुरती तरतरी येते, पण दीर्घकाळ वापराने कर्करोग, तोंडाचे आजार संभवतात.