Roshan Talape
लिंबाच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
लिंबाच्या सालीतील कॅल्शिअम आणि जीवनसत्त्व क हाडांना बळकटी देऊन त्यांच्या आरोग्याच्या सुधारण्यात मदत करतात.
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते आणि आरोग्य स्वच्छ ठेवते.
लिंबाच्या सालीत कर्करोग विरोधी गुणधर्म असतात, जे कर्करोगाशी लढण्यास उपयुक्त ठरतात.
कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवून हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी लिंबाची साल फायदेशीर ठरते.
लिंबातील सायट्रिक ॲसिडमुळे दातदुखी, हिरड्यांमधून रक्त येणे अशा समस्या दूर होतात आणि तोंड स्वच्छ राहते.
लिंबाच्या सालीमधील पेक्टिन नावाचा घटक वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
तसेच त्वचेवरील सुरकुत्या, पुरळ व काळे डाग कमी करते आणि त्वचा निरोगी ठेवण्यास लिंबाची साल मदत करते.