Fried Oil Use : तुम्हीही तळलेल तेल पुन्हा - पुन्हा वापरताय ?

Team Agrowon

तेलाचा प्रकार

तेलामध्ये तळताना होणा-या रासायनिक प्रक्रिया तेलाचा प्रकार, तेलाचे तापमान, तळण्याची वारंवारता, वापरण्यात येणाऱ्या तेलाची गुणवता, अन्नपदार्थांचा प्रकार, तळण उपकरणांचा वापर व तेलातील अँटीऑक्सीडंट चे प्रमाण व प्रकार इत्यादी घटकांवर अवलंबुन असतात. 

Fried Oil Use | Agrowon

तळण्याचा प्रकार

तव्यामध्ये तळलेल्या प्रकारात अन्नपदार्थात सर्व तेल शोषले जाते व उथळ तळण प्रकारात अन्नपदार्थाने तेल शोषुण सुध्दा थोडया प्रमाणात तेल उरत. 

Fried Oil Use | Agrowon

खोल तळण

खोल तळण प्रकारात अन्नपदार्थ तळल्यानंतरही मोठया प्रमाणात तेल उरत व अस उरलेल तेल पुन्हा वापरल जात.  

Fried Oil Use | Agrowon

तळलेल्या तेलात असतात विषारी घटक

तळलेल्या तेलात फ्री फॅटी अँसीड, पॉलीमरीक पदार्थ, फ्री रॅडीकल्स सारखे विषारी घटक तयार होतात. तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्याने तेलातील विषारी घटक शरीरातील चांगल्या पेशींवर हल्ला करतात.

Fried Oil Use | Agrowon

विविध रोगाचा धोका

तळलेल्या तेलामुळे घशाची जळजळ, पित्ताचे विकार, हृदयरोग, अल्झायमर, पार्कींनसन, कर्करोग, हाडांचे विकार सारखे रोग होण्याचा धोका वाढतो.

Fried Oil Use | Agrowon

पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अँसीडचे प्रमाण जास्त

नुकत्याच झालेल्या संशोधनात अस आढळल की, सोयाबीन, करडई व सुर्यफुल तेल ज्यामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अँसीडचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळत.

Fried Oil Use | Agrowon

आरोग्यास हानीकारक पदार्थ

तळलेल तेल वारंवार गरम केल्यान त्यात  ४- हायड्रॉक्सीट्रान्स -२-नॉनेनल (HNE) नावाचा विषारी व आरोग्यास हानीकारक पदार्थ तयार होतो. 

Fried Oil Use | Agrowon