Mahesh Gaikwad
'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' अशा आशयाची टिव्हीवर लागणारी जाहिरात तुम्ही पाहिलीच असेल.
अंड्यांमध्ये असणारे पोषक घटक आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे डॉक्टरही रोज एकतरी अंडे खाण्याचा सल्ला देतात.
तुम्ही आजपर्यंत कोंबडीचे पांढरे किंवा फिक्कट तपकरी रंगाचे अंडे पाहिले असेल. पण जगात कोंबडीची अशी एक जात आहे, जी चक्क निळ्या रंगांची अंडी देते.
ऐकून विचित्र वाटलं ना. पण हे खरे आहे. निळ्या रंगाची अंडी देणाऱ्या या कोंबडीच्या जातीचे नाव आहे अरौकाना.
ही कोंबडी चिली देशामध्ये आढळते. चिली देशातील अरौकानिया या भागात ही कोंबडी आढळते. त्यामुळे अरौकाना असे या कोंबडीचे नाव ठेवण्यात आले आहे.
रेट्रो व्हायरसमुळे या कोंबडीच्या अंड्यांचा रंग निळा होतो. व्हायरसचा परिणाम अंड्याच्या कवचावर होतो.
स्पेनचे शास्त्रज्ञ साल्वाडोर कॅसेल यांनी १९१४ मध्ये ही कोंबडीची जात पाहिल्याचे सांगितले जाते.
व्हायरचा अंड्याच्या आतील भागावर कोणताही परिणाम होत नसल्याने खाण्यासाठी अंडी सुरक्षित असतात. ही बातमी सामान्य माहितीसाठी आहे.