Aslam Abdul Shanedivan
लेमनग्रास हे अगदी सामान्य गवतासारखे दिसते, पण ती उकळून पिल्यास किंवा तिच्या तेलाचा वास घेतल्यास त्याची चव ही लिंबाप्रमाणे येते.
लेमनग्रासचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये करण्यात येतो. तर स्वादिष्ट पदार्थांची चव वाढवण्यासाठी आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी देखील लेमनग्रासचा वापर होतो.
लेमनग्रासमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात
लेमनग्रासमध्ये बॅक्टेरिया रोधक पदार्थ असतात. लेमनग्रास जर चहाच्या स्वरूपात प्यायल्यास ते कोणत्याही प्रकारचे संक्रमण दूर ठेवू शकते.
कीटकनाशक गुणधर्म
आपल्या घरात कीटक किंवा डासांचा त्रास होत असेल तर तुम्हाला कीटकनाशक म्हणून लेमनग्रास फार लाभदायक ठरते.
जर लेमनग्रासची पाने किंवा फांद्या तोडून त्याचा चहात वापर केल्यास तुमचा मूड चांगला होतो. तसेच तणाव नाहीसा होतो.
तणावामुळे झोप येत नसल्यास लेमनग्रास तेला किंवा त्याचा चहा प्या. झोप चांगील येईल. तर लेमनग्रासमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने सांधे दुखी कमी होण्यास मदत होते.