Aslam Abdul Shanedivan
एखादे काम करण्यासाठी, त्यात सातत्य ठेवण्यासाठी शारीर आरोग्यासह मानसिक आरोग्य चांगेल असणे गरजेचे असते
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फळे फार उपयोगी ठरतात. फळे नैराश्य दूर करतात.
माणसाच्या मेंदूचे न्यूरोडीजनरेशन झाल्यास नैराश्याची अनेक लक्षणे दिसून येतात
तर नैराश्याची अनेक लक्षणे खासकरून वृद्धापकाळात दिसून येतात. यामुळे सामान्य जीवन जगतानासुद्धा अनेक अडथळे निर्माण होतात
वृद्धापकाळातील नैराश्याची अनेक लक्षणे कमी करण्यासाठी सफरचंद, संत्री आणि केळी यांसारखी फळे फार उपयोगी पडतात
सफरचंद, संत्री आणि केळी या फळांमध्ये व्हिटॅमिन सी, कॅरोटीनॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्स यांसारखे अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात
सफरचंद, संत्री आणि केळी फळांमधील पोषक घटक ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होते. त्यामुळे नैराश्य दूर होते. (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)