Team Agrowon
ड्रोन तंत्रज्ञानाला मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही) म्हणतात. डेटा गोळा करणे, पीक निरीक्षण आणि फवारणीसाठी हे तंत्र फायदेशीर आहे.
सेन्सर आणि कॅमेऱ्यांनी सुसज्ज ड्रोन पिकांच्या उच्च गुणवत्तेच्या प्रतिमा टिपतात. वनस्पतींचे आरोग्य, वाढीचे नमुने आणि पोषक तत्त्वांची कमतरता किंवा किडीचा प्रादुर्भाव यांसारख्या संभाव्य समस्यांबद्दल माहिती मिळते.
ड्रोनने काढलेल्या छायाचित्रामुळे शेतकऱ्यांना सिंचन, खत आणि कीटकनाशकांच्या वापरासाठी योग्य माहिती उपलब्ध होते.
सर्व पिकांवरील फवारणी तसेच उसासारख्या उंच पिकांवर फवारणीसाठी उपयुक्त आहे. ड्रोन हे बॅटरीवर चालतात. सुरक्षित आणि अचूक प्रभावी फवारणीसाठी ड्रोनचा वापर फायदेशीर आहे.
ड्रोनमुळे शेताचे अचूक नकाशा मिळवणे शक्य होते, त्यामुळे पीक परिस्थितीची अचूक माहिती मिळते.
प्रगत विश्लेषण आणि सॉफ्टवेअर साधनांचा वापर करून जमा झालेल्या माहितीवर योग्य प्रक्रिया करून शेतीमध्ये काय करणे गरजेचे आहे, याचे नियोजन करणे शक्य होते.
पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत शेतीकामांसाठी ड्रोनचा वापर केल्याने वेळ आणि मजुरीचा खर्च वाचतो.