Aslam Abdul Shanedivan
निरोगी आणि चांगल्या आरोग्यासाठी फळ, भाज्यांसह ड्राय फ्रुडचे सेवन करणे गरजेचे असते. यात अंजीर खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात
अंजीर आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मानले जात असून यात फायबर, झिंक, मँगनीज, मॅग्नेशियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक तत्व असतात
अंजीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठी चांगले मानले जातात आणि ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतात.
अंजीर रक्तदाबासाठी फायदेशीर असून यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
अंजीरमध्ये असणारे कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते.
अंजीरमधील तांबे, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम सारखी पोषक तत्वे आपली भूक वाढवत नाहीत. यामुळे वजन झपाट्याने कमी होते.
चांगल्या फायद्यासाठी अंजीर रात्रभर पाण्यात भीजवून ठेवावे. तर ते सकाळी ब्रश केल्यानंतर रिकाम्या पोटी खावे. यामुळे आरोग्यावर चांगला परिणाम होतो.