Anuradha Vipat
वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी आपल्या दिनचर्येतील काही सवयींमुळे आपण दीर्घकाळ तरुण आणि उत्साही राहू शकतो.
बदलत्या जीवनशैलीनुसार स्वतःला फिट ठेवण्यासाठी खालील सवयी आवर्जून अंगीकारल्या पाहिजेत.
झोपेतच आपल्या शरीरातील पेशींची दुरुस्ती होत असते. दररोज रात्री ७ ते ८ तासांची शांत झोप घेतली पाहिजे.
वृद्धत्व रोखण्यासाठी पाणी हे सर्वोत्तम औषध आहे. पुरेशा पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी तुमच्या आहारात रंगीत फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
केवळ शरीरच नव्हे तर त्वचा तरुण ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे.
अति विचार आणि मानसिक ताणामुळे अकाली वृद्धत्व येते. चेहऱ्यावर चिंता असेल तर वय जास्त दिसते.