Animal Care : जनावरांना होऊ शकते कांद्याची विषबाधा

Team Agrowon

काही भागामध्ये मोकळी सोडलेली जनावरे कांद्याच्या शेतात चरताना आढळून येतात. ही जनावरे नकळतपणे किंवा नाइलाजास्तव पातींसोबत कांदा देखील खातात. परिणामी, कांद्यातील विषारी घटकांमुळे जनावरांना विषबाधा होते.

Animal Care | Agrowon

कांद्यामध्ये डायसल्फाइड, एन प्रोपायल डायसल्फेट, आणि एस मिथाईल आणि एस प्रोपि(एन)ल सीस्टीन सल्फोक्साइड, हे घातक घटक असतात.

Animal Care | Agrowon

कांद्यापासून होणाऱ्या विषबाधेसाठी मेंढ्या आणि शेळ्यांच्या तुलनेत गाई, म्हशी अधिक संवेदनशील असतात.

Animal Care | Agrowon

अतिरिक्त प्रमाणात कांदा पिकाचे सेवन झाल्यास विषबाधा होऊन खाद्य सेवन क्षमता कमी होणे, दूध कमी होते, गडद रंगाची विष्ठा आणि लघवी अशी लक्षणे दिसून येतात.

Animal Care | Agrowon

जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन दूध उत्पादन कमी होते, पशू उपचाराचा खर्च वाढतो. हे लक्षात घेऊन कांद्यापासून होणारी विषबाधा समजून घेणे आवश्यक आहे.

Animal Care | Agrowon

Animal Careकांद्याच्या विषबाधेमुळे शरीरात वायू अधिक प्रमाणात तयार होतो. तयार होणारे वायू आवश्यक प्रमाणात शरीराबाहेर न टाकल्यामुळे जनावरांना पोटफुगी होते. जनावरांमध्ये चयापचया संबंधित आजार दिसतात.

Animal Care | Agrowon

जनावराच्या मुख्य पोटाचा (रूमेन) सामू ६.५ ते ७ च्या दरम्यान असतो, तो आजारात ५.५ पेक्षा खाली येतो. त्यामुळे पोटाची हालचाल मंदावते, जनावरांना भूक लागत नाही आणि परिणामी दूध उत्पादन घटते.

Animal Care | Agrowon