Team Agrowon
कॅल्शिअम हा खनिज पदार्थापासून शरीरातील सर्व हाडे बनलेली असतात.
प्रसूतीदरम्यान गर्भाशयाच्या स्नायूंच्या आकुंचन आणि प्रसारणासाठी कॅल्शिअम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
रक्तातील कॅल्शिअमची पातळी कमी झाल्यास प्रसूतीस बाधा निर्माण होते, गर्भपिशवी, अंग बाहेर येते.
कॅल्शिअम च्या कमतरतेमुळे तोंडातील स्नायू आकुंचन पावल्याने खाणे कमी होऊन रवंथ प्रक्रिया कमी होते.
कॅल्शिअम कमतरतेमुळे जनावरांची शारीरिक ऊर्जा मंदावल्याने स्निग्ध पदार्थांची साठवण होऊन फॅटी लिव्हर सिंड्रोम आणि केटोसिस आजार होतो.
कॅल्शिअम चे प्रमाण जास्त झाल्यास गाभण राहण्याचा दर कमी होतो. जनावरांमध्ये दररोज ०.७५ ते ०.८५ टक्का कॅल्शिअमची गरज असते.
कॅल्शिअम च्या कमतरतेमुळे गर्भपिशवीचे पुनर्स्थापनेत उशीर होतो.