Animal Care : वाढतं उन जनावरांसाठी तापदायक

Team Agrowon

हिरव्या चाऱ्याची टंचाई

उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई, उष्णतेचा त्रास आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई असे अनेक प्रश्न तयार होत आहेत. अशा परिस्थितीत जनावरांना आजार होण्याची शक्यता असते.

Animal Care | Agrowon

रक्तस्राव

अति उष्णतेमुळे जनावरांच्या नाकातून रक्तस्राव होत असतो. नाकातून लाल-गडद रंगाचे रक्त वाहते.

Animal Care | Agrowon

विषबाधा

हिरव्या वैरणीच्या कमतरतेमुळे जनावरे मिळतील त्या हिरव्या वनस्पती खातात. यामुळे विषारी वनस्पती घाणेरी, गुंज, धोतरा खाण्यात येऊन विषबाधा होते.

Animal Care | Agrowon

उष्माघात

आजार अतिप्रखर सूर्य किरणे, पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे होतो. शरीराची कातडी कोरडी पडते, जनावरे थकल्यासारखी होतात, भूक मंदावते, दूध देणे कमी होते.

Animal Care | Agrowon

कडव्या

अति प्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांच्या कातडीला आजार होतो.

Animal Care | Agrowon

कॅल्शिअम कमतरता

हिरव्या चाऱ्याअभावी जनावरांना उसाचे वाढे दिले जाते. जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे वाढ्यामधील ऑक्झेलेट खनिज आणि जनावरांच्या शरीरातील कॅल्शिअम एकत्र होऊन लघवीवाटे निघून जाते, त्यामुळे कॅल्शिअमची पातळी कमी होते.

Animal Care | Agrowon