Animal Care : जनावरांच्या आजारावर घरच्या घरी साधे उपचार!

Sanjana Hebbalkar

जनावर आजारी

जनावर कोणत्या ना कोणत्या कारणाने आजारी पडतं. त्यामुळे शेतीतील काम राहतात आणि जनावरालादेखील त्रास होतो

Animal Care | Agrowon

घरचे उपाय

यावेळी पशुवैदयकांना बोलावून उपचार करण्याऐवजी काही घरगुती उपायांनी आजार बरे करता येतात.

Animal Care | Agrowon

अतिसार

चांगले बारीक दळलेले कोवळे डाळिंब, पेरू, कडुनिंबाची पाने, ५० ग्रॅम सुंठ पावडर आणि १०० ग्रॅम गूळ या मिश्रणाच्या बोराच्या आकाराच्या गोळ्या तयार करा.

Animal Care | Agrowon

३ गोळ्या

३ गोळ्या एकावेळेस याप्रमाणे दिवसातून ३ वेळा हगवण बरी होईपर्यंत जनावरांना खायला द्यावेत.

Animal Care | Agrowon

गोचीड

प्रत्येकी २० ग्रॅम आले, तुळस, कडुनिबांची पाने, हळद पावडर आणि सीताफळाच्या बिया एकत्रितपणे चांगल्या बारीक करून २५० मिलि. कडुनिबांच्या तेलात उकळावे आणि थंड झाल्यावर तयार मिश्रण जनावरांच्या शरीराला लावावे.

Animal Care | Agrowon

विषबाधा

जनावरे कुरणांवर चरताना काही विषयुक्त पदार्थ किंवा विष खाल्ल्यामुळे विषबाधा होते.

Animal Care | Agrowon

विड्याची पाने

१० ग्रॅम विड्याची पाने, तुळशीची पाने, काळी मिरी व सुंठ एकत्रित बारीक करून कोमट पाण्यात मिसळून जनावरांना त्वरित पाजावे.

Animal Care | Agrowon

दूध वाढीसाठी

तीन चमचे शतावरीच्या मुळांचा पावडर ३०० ग्रॅम करडईच्या ढेपेत मिसळून १५ दिवस दुधाळ जनावरांना खाद्यात दिल्याने दूध उत्पादनात वाढ होऊन दूध देण्याचा कालावधी वाढतो.

Animal Care | Agrowon
Animal Care | Agrowon