Sanjana Hebbalkar
अपचन, पोट गच्च होणे, पोटदुखी यांसारखे पोटाचे आजार जनावरांमध्ये बऱ्याच वेळा आढळतात.
यावर आपण पशुवैद्यकाला बोलावण्यापेक्षा घरच्या घरी उपचार केलेले चांगले आणि योग्य ठरतात. त्यानंतर तुम्ही त्याचा सल्ला घ्या.
सुंठ,आले ही वनस्पती पचनास उपयुक्त ठरणारी वनस्पती आहे. पचनावेळी पाचक रसांची निर्मिती करण्याचे काम सुंठीमुळे होते.
पोठात हवा जमा झाली की जनावर अन्न खात नाही अशावेळी काळ मीठ अंत्यत महत्त्वाचं ठरतं. यामुळे जमा झालेला गॅस निघून जातो
पिंपळी मध्ये असलेल्या गुणधर्मामुळे अपचन, मळमळ, गॅसे या सगळ्यापासून जनावरांची सुटका होते.
प्राण्यानां ओवा खायला दिल्यास पोटातील जळजळ कमी होऊन पोट साफ होण्यास मदत होते.
वेगवेगळ्या पाचक रसांच्या निर्मिती अन्नपचनाच्या प्रक्रियेत जिरे या वनस्पतीचा अत्यंत चांगला उपयोग होतो.