Anuradha Vipat
सतत आणि लगेच राग येणे ही केवळ एक मानसिक स्थिती नसून त्यामागे अनेक शारीरिक आणि जीवनशैलीशी संबंधित कारणे असू शकतात.
जेव्हा तुमची ७-८ तासांची झोप पूर्ण होत नाहीतेव्हा लहान लहान गोष्टींवरूनही तीव्र चिडचिड होते.
सतत येणारा राग हा 'ॲन्झायटी' , नैराश्य किंवा 'बायपोलर डिसऑर्डर' यांसारख्या मानसिक समस्यांचे लक्षण असू शकतो
सततचा ताण मनाची सहनशक्ती कमी करतो. तेव्हा थोडासाही अडथळा रागाच्या स्वरूपात बाहेर येतो.
शरीरात व्हिटॅमिन बी-१२, डी आणि मॅग्नेशियमची कमतरता असल्यास नैराश्य आणि राग येण्याचे प्रमाण वाढते.
जेव्हा हॉर्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होतात ज्यामुळे राग येतो.
जेव्हा रक्तातील साखरेची पातळी कमी होते. यामुळे मेंदूला ऊर्जा कमी पडते आणि चिडचिड वाढते .