Anuradha Vipat
वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार, घरात मृत व्यक्तींचे फोटो लावणे योग्य मानले जाते.
घरात मृत व्यक्तींचे फोटो लावताना काही विशिष्ट नियमांचे आणि दिशांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
मृत व्यक्तींचे फोटो नेहमी घराच्या दक्षिण भिंतीवर लावावेत. दक्षिण ही यमाची आणि पितरांची दिशा मानली जाते.
देवघरात देवांच्या मूर्ती किंवा फोटोंसोबत मृत व्यक्तींचे फोटो कधीही ठेवू नयेत.
ज्या फोटोमध्ये जिवंत व्यक्ती आहेत, अशा फोटोमध्ये मृत व्यक्तींचा चेहरा एकत्र नसावा.
मृत व्यक्तीचा फोटो नेहमी प्रसन्न किंवा शांत मुद्रेतील असावा. रडणारा, दुःखी किंवा उग्र चेहऱ्याचा फोटो भिंतीवर लावू नये.
घराच्या अगदी मध्यभागी किंवा सर्वांचे सारखे लक्ष जाईल अशा ठिकाणी फोटो लावणे टाळावे.