Ammonia In Shed: गोठ्यातील अमोनिया जनावरांसाठी धोकादायक! उन्हाळ्यात नियंत्रण कसे कराल?

Swarali Pawar

गोठ्यात अमोनिया वाढतोय?

उन्हाळ्यात तापमानासोबत गोठ्यात अमोनिया वायूही वाढतो. याचा जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

Ammonia Control in Shed | Agrowon

अमोनिया तयार कसा होतो?

जनावरांच्या शेण आणि कोंबड्यांच्या शीटमधून अमोनिया तयार होतो. ओलसर आणि बंदिस्त वातावरणामुळे तो अधिक वाढतो.

Ammonia Control in Shed | Agrowon

कोंदट गोठा म्हणजे धोका

हवा खेळती नसल्यास अमोनिया गोठ्यातच साचतो. यामुळे उष्णता आणि आजारांचा धोका वाढतो.

Ammonia Control in Shed | Agrowon

जनावरांवर होणारे परिणाम

अमोनियामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो. वासरांमध्ये सर्दी, कफ आणि निमोनियाचा धोका वाढतो.

Ammonia Control in Shed | Agrowon

कोंबड्यांवरही परिणाम

कोंबड्यांना घामग्रंथी नसल्याने त्यांना जास्त त्रास होतो. अमोनियामुळे धाप लागून मृत्यूही होऊ शकतो.

Ammonia Control in Shed | Agrowon

गोठा कोरडा ठेवा

ओलसर वातावरण टाळा आणि शेण-मूत्र लगेच साफ करा. यामुळे अमोनिया तयार होण्याचे प्रमाण कमी होते.

Ammonia Control in Shed | Agrowon

हवा खेळती ठेवा

गोठ्यात पंखे, वेंटिलेशन आणि उंच छप्पर असावे. गरम हवा वर जाऊन थंड हवा खाली राहते.

Ammonia Control in Shed | Agrowon

नियमित स्वच्छता आवश्यक

कोंबड्यांच्या शेडमधील तूस रोज उलटपालट करा. स्वच्छता आणि योग्य व्यवस्थापनाने अमोनिया नियंत्रणात राहतो.

Ammonia Control in Shed | Agrowon

Sugarcane Irrigation: कमी पाण्यात उसाची वाढ कशी टिकवावी? शेतकऱ्यांसाठी प्रभावी उपाय

अधिक माहितीसाठी..