Amla Reetha Shikakai : केसांच्या सर्व समस्यांपासून सुटका हवी? जाणून घ्या आवळा, रिठा आणि शिकेकाई वापरण्याची योग्य पद्धत

Anuradha Vipat

आयुर्वेदिक उपाय

केसांच्या सर्व समस्यांवर आवळा, रिठा आणि शिकेकाई या तिघांच्या मिश्रणाचा घरगुती हर्बल शाम्पू किंवा हेअर पॅक हा आयुर्वेदिक उपाय मानला जातो.

Amla Reetha Shikakai | Agrowon

मुळापासून मजबूत

केमिकलयुक्त शाम्पूऐवजी या नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास केस मुळापासून मजबूत होतात.

Amla Reetha Shikakai | agrowon

आवळा

व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध असल्याने केसांची मुळे मजबूत करतो, केस गळती थांबवतो आणि अकाली पांढरे होणारे केस काळे ठेवण्यास मदत करतो.

Amla Reetha Shikakai | agrowon

रिठा

यामध्ये नैसर्गिक 'सॅपोनिन्स' असतात, जे केमिकलशिवाय नैसर्गिक फेस तयार करून टाळूवरील तेल, धूळ आणि घाण स्वच्छ करतात.

Amla Reetha Shikakai | agrowon

शिकेकाई

केसांना नैसर्गिक कंडिशनिंग देते, केसातील गुंता सोडवते, कोंडा कमी करते आणि केसांना चमकदार व मऊ बनवते.

Amla Reetha Shikakai | agrowon

घरच्या घरी नैसर्गिक शाम्पू कसा बनवावा?

साहित्य: १०० ग्रॅम सुका आवळा, १०० ग्रॅम रिठा आणि १०० ग्रॅम शिकेकाई .

कृती: आवळा, रिठा आणि शिकेकाई रात्रभर १ लिटर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे सर्व मिश्रण त्याच पाण्यासह मंद आचेवर १५ ते २० मिनिटे पाणी अर्धे होईपर्यंत उकळा. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर हाताने चांगले कुस्करून घ्या आणि गाळणीने किंवा सुती कापडाने गाळून एका बाटलीत भरून ठेवा.

Amla Reetha Shikakai | agrowon

वापरण्याची पद्धत

केस ओले करून हा तयार हर्बल शाम्पू टाळूवर व केसांवर लावा, ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा आणि साध्या पाण्याने केस धुवा.

Amla Reetha Shikakai | agrowon

Winter Fashion : थंडीपासून बचाव आणि सोबतच जबरदस्त स्टाईल! स्वेटर, शाल आणि जॅकेटचे स्मार्ट लेयरिंग कसे करावे? वाचा खास टिप्स

Winter Fashion | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...