Mahesh Gaikwad
आवळा म्हणजे व्हिटामिन-सी चा सर्वोत्तम स्त्रोत. आवळ्यातील गुणधर्म उजळ त्वचा आणि अँटी-एजिंगसाठी फायदेशीर आहेत.
आवळ्यामध्ये अँन्टी-एजिंगसाठीचे सुपरफूड म्हटले जाते. ज्याच्या सेवनामुळे तुमची त्वचा तरूण राहते.
आवळ्यामध्ये असणारे पॉलिफिनॉल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स हे तत्त्व त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.
आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्ताची गुणवत्ता सुधारते. ज्यामुळे रक्त शुध्द होते आणि चेहऱ्यावरील मुरूम, पिंपल्स सारख्या समस्या कमी होतात.
आवळ्याचे नियमित सेवन केल्यास त्वचेतील कोलेजन निर्मिती वाढण्यास मदत होते. यामुळे त्वचा टवटवीत आणि उजळ दिसते.
रक्तशुध्दीसाठी आवला उत्तम आहे. याच्या सेवनामुळे रक्तशुध्द होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. ज्यामुळे त्वचा चमकदार होते.
दररोज सकाळी आवळ्याचा रस पिल्यामुळे त्वचेला आवश्यक असणारे पोषण आतून मिळते. त्यामुळे याला नॅचरल ग्लो बूस्टर ड्रिंक असेही म्हणतात.
आवळ्याचा रस उपलब्ध नसल्यास, आवळ्याची पावडर आणि मध एकत्र करून घेतल्यामुळे चांगला फायदा होतो.