Anuradha Vipat
भेंडी ही आपल्या स्वयंपाकघरात नियमित बनवली जाणारी एक लोकप्रिय भाजी आहे.
भेंडीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन A, C, K, बी-कॉम्प्लेक्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
ही भाजी केवळ पचनासाठीच नाही, तर स्मरणशक्ती तीव्र करण्यासाठी आणि मेंदूच्या उत्तम कार्यक्षमतेसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते
भेंडीमध्ये फोलेट आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. फोलेट मेंदूच्या पेशींच्या विकासासाठी आणि कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे.
भेंडीमध्ये विद्राव्य फायबर आणि एक विशिष्ट चिकट द्रव असतो. हा चिकट द्रव आतड्यांमधून मळ सहज पुढे सरकवण्यास मदत करतो.
भेंडीमधील फायबर रक्तामध्ये साखर शोषून घेण्याचा वेग मंदावते. यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
भेंडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी असते आणि फायबर जास्त असते. यामुळे ती खाल्ल्यानंतर पोट भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही