Jeshthmadha Benefits : बहुगुणी जेष्ठमधाचे आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदे

Mahesh Gaikwad

आयुर्वेदीक उपचार

आयुर्वेदीक उपचार पध्दतीमध्ये ज्येष्ठमधाचा वापर औषध म्हणून केला जातो. आरोग्याच्यादृष्टीने ज्येष्ठमध अतिशय उपयोगी औषधी आहे.

Jeshthmadha Benefits | Agrowon

औषधी गुणधर्म

ज्येष्ठमधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे अनेक रोग आणि आजारांवर मात करण्यासाठी जेष्ठमध गुणकारी आहे.

Jeshthmadha Benefits | Agrowon

तोंड येणे

शरीरात उष्णता वाढल्यामुळे बऱ्याचदा तोंड येण्याची (माऊथ अल्सर) समस्या उद्भवते. जेष्ठमधाची पावडर गायीच्या तुपात मिसळून लावल्यास तोंड येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

Jeshthmadha Benefits | Agrowon

पित्ताचा त्रास

पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी जेष्ठमधाचे चूर्ण, मध, आवळा पावडर आणि तूप यांच्या मिश्रणाचे चाटण खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Jeshthmadha Benefits | Agrowon

अतिसार

अतिसाराच्या समस्येवर जेष्ठमध, जायफळ, डाळिंबाच्या सालीची पावडर आणि खडीसाखर यांचा काढा करून प्यावा. यामुळे अतिसारापासून लगचे आराम मिळेल.

Jeshthmadha Benefits | Agrowon

उचकी लागणे

अनेकांना अचानक उचकी लागते. पाणी पिऊनही उचकी थांबत नसल्यास जेष्ठमधाच्या चूर्णामध्ये मध मिसळून त्याचे चाटण करावे. हे चाटल्यानंतर लगेच फरक दिसून येईल.

Jeshthmadha Benefits | Agrowon

घशाची खवखव

घशाची खवखव काही केल्या थांबत नसेल किंवा सतत घसा दुखत असेल, तर जेष्ठमध हा सर्वात चांगला उपाय आहे. जेष्ठमधाची पावडर, तूप आणि गूळ यांचे चाटण दिवसभरात २-३ वेळा चाटावे. घशाची खवखव थांबण्यास मदत होईल.

Jeshthmadha Benefits | Agrowon

पित्त उसळणे

काहींना अंगावर पित्त उसळण्याचा त्रास होतो. यावर जेष्ठमध हा अत्यंत गुणकारी उपाय आहे. उगाळलेले जेष्ठमध दुधातून घेतल्यास लगेच फरक पडेल.

Jeshthmadha Benefits | Agrowon
Amal Benefits | Agrowon