Mahesh Gaikwad
पावसाळ्याच्या दिवसांत भाजलेलं मक्याचं कणिस खायला कोणाला आवडंत नाही, पण गरमागरम उकडलेल्या मक्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
मक्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरारीला दिवसभराची उर्जा देते.
मका फायबरयुक्त घटकाने समृध्द असतो. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बध्दकोष्ठतेची समस्या कमी होते.
मक्यामध्ये असणारे अँटीॉऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशिअममुळे ह्रदयाचे आरोग्य सुधारते.
मका डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून यामुळे दृष्टी सुधारते आणि वयासोबत होणारे डोळ्यांचे त्रास टाळतात.
मक्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. मका खाल्ल्यामुळे दिर्घकाळासाठी पोट भरल्यासारखे वाटते. मका वजन कमी करण्यासाठी उत्तम आहे.
पावसाळ्यात मका खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गापासून बचाव होतो.
मक्यामधील व्हिटामिन-सी आणि अँटीॉऑक्सिडंट्स त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.