Anuradha Vipat
गवार ही आपल्या रोजच्या आहारातील एक अतिशय पौष्टिक आणि फायबरयुक्त भाजी आहे. अनेकांना गवारची भाजी खायला आवडत नाही.
गवारमध्ये मुबलक प्रमाणात विरघळणारे फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन A, C, K आणि लोहाचे प्रमाण असते.
या भाजीमध्ये 'ग्वार गम' नावाचे फायबर असते, जे रक्तामध्ये साखर वेगाने शोषली जाण्यापासून रोखते.
गवारमध्ये विद्राव्य फायबर भरपूर प्रमाणात असते. हे आतड्यांचे आरोग्य सुधारते, मळ मऊ करते आणि जुनाट बद्धकोष्टतेचा त्रास मुळापासून दूर करण्यास मदत करते.
गवारमध्ये कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी असते आणि फायबर जास्त असते. ही भाजी खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
गवार हाडांची घनता वाढवण्यासाठी आणि वाढत्या वयातील सांधेदुखी किंवा ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
यामध्ये लोह चांगले असते, जे शरीरात लाल रक्तपेशींची निर्मिती वाढवते. ॲनिमियाचा त्रास असलेल्या महिलांसाठी ही भाजी अत्यंत गुणकारी आहे.