Mahesh Gaikwad
आयुर्वेदीक औषधोपचारांमध्ये तुपाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे तुपाला आयुर्वेदात अमृततुल्य असेही म्हटले जाते.
रिकाम्या पोटी तूप खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये स्नेहन होते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि गॅस, अपचन या सारख्या समस्या दूर होतात.
तुपामध्ये फॅटी अॅसिड्स असतात, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते. परिणामी बुध्दकोष्ठतेची समस्या कमी होते.
तुपाचे सेवन केल्यामुळे त्वचा मऊ, तजेलदार होते. तसेच केसांची गळती कमी होऊन त्यांना पोषण मिळते.
तूप अँटीॉऑक्सिडंट्सने समृध्द असते. दररोज रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराचा आजारांपासून बचाव होतो.
तुपातील ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स व व्हिटामिन्स मेंदूला पोषण देतात. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
तुपामुळे शरीरातील स्निग्धांश टिकून राहतो. त्यामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी कमी होते आणि लवचिकता वाढते.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा तूप कोमट पाण्यासोबत घ्यावे. मात्र, जास्त प्रमाण टाळावे.