Anuradha Vipat
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत झाली असतील, तर राजगिरा पालेभाजी हा एक उत्तम नैसर्गिक पर्याय आहे.
या पालेभाजीत दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम आणि अनेक आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराला निरोगी ठेवतात.
राजगिरा पालेभाजीत भरपूर प्रमाणात नैसर्गिक कॅल्शियम असते, जे ऑस्टिओपोरोसिस आणि सांधेदुखीपासून रक्षण करते.
या भाजीमध्ये लोह आणि फॉलिक ॲसिडचे प्रमाण खूप जास्त असते. याचे नियमित सेवन केल्याने ॲनिमिया तसेच अशक्तपणाचा त्रास दूर होतो.
राजगिरा भाजीत व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. हे डोळ्यांची दृष्टी तेज राखण्यास मदत करते
हे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी वाढवून संसर्गजन्य आजार, सर्दी-खोकला यांपासून शरीराचा बचाव करते.