Aslam Abdul Shanedivan
गूळ हा ऊस आणि ताडाच्या झाडाच्या रसापासून आणि आता नारळाच्या पाण्यापासून देखील बनवला जात आहे. जो साखरेला पर्याय आहे
भारतीय संस्कृतीमध्ये गुळाला विशेष महत्त्व असून तो आजही चिक्की किंवा लाडू तयार करण्यासाठी वापरला जातो. तसेच पुरण पोळी आणि चहासाठी देखील वापरला जातो
गुळाच्या सेवनाने पौष्टिक फायदे मिळत असले तरीही यात साखर असतेच यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांना हानीकारक ठरू शकते
गुळामध्ये पौष्टिक घटक असून यात सुक्रोज असते. तसेच लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि भरपूर अँटिऑक्सिडंट्ससुद्धा असते.
गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ५५ असून रिफाइंड साखरेचा इंडेक्स ६५ असतो. यामुळे गूळ अती खाऊ नये
बदाम, काजू व शेंगदाण्यांसारख्या सुक्या मेव्याबरोबर गुळाचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.
डब्ल्यूएचओ (WHO) च्या शिफारशीनुसार, तुमच्या दररोजच्या कॅलरीज सेवनामध्ये साखरेचे प्रमाण हे पाच टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. तर गुळाचे सेवन हे सकाळी आणि दुपारच्या जेवणानंतर करावे.