Aloe Vera Farming : शेतकऱ्यांसाठी कोरफड शेतीचा पर्याय ; बाजारात मोठी मागणी

Team Agrowon

आयुर्वेदीक औषधे

आयुर्वेदीक औषधांपासून ते सौंदर्य प्रसाधने उत्पादनांसाठी कोरफडीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

Aloe Vera Farming | Agrowon

औषधी घटक

कोरफडीमध्ये औषधी घटक असतात. त्यामुळे कॉस्मेटीक बनविणाऱ्या कंपन्यांकडून कोरफडीला मोठी मागणी असते.

Aloe Vera Farming | Agrowon

कोरफड शेती

एक एकर क्षेत्रावर जर कोरफडीचे पीक घेतले तर त्यातून वर्षाकाठी २० हजार किलोपर्यंत उत्पादन मिळते.

Aloe Vera Farming | Agrowon

कोरफडीची पाने

कोरफडीची ताजी पानांना साधारणपणे ६ रुपये प्रतिकिलोपर्यंतचा दर मिळतो. मागणीनुसार यामध्ये वाढही होते.

Aloe Vera Farming | Agrowon

कॉस्मेटीक कंपन्या

तुम्ही जर कोरफडीची शेती केली, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरफड विकायची कोठे हा प्रश्न तुम्हाला पडेल. तुम्ही सौंदर्य प्रसाधने उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना ही कोरफड विकू शकता.

Aloe Vera Farming | Agrowon

कोरफडीला मागणी

कॉस्मेटीक कंपन्यांकडून कोरफडीला मोठी मागणी असते. त्यामुळे या कंपन्याच कोरफड खरेदी करतात.

Aloe Vera Farming | Agrowon

कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग

कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा कोरफडीच्या शेतीसाठी चांगला पर्याय आहे. कारण शेतकऱ्याला कोरफड विक्रीसाठी बाजारपेठ शोधण्याची गरज नसते.

Aloe Vera Farming | Agrowon

कोरफडीचा गर

कोरफडीची ताजी पाने विक्री करण्याऐवजी त्याचा गर काढून विक्री केल्यास २० रुपयांपर्यंतचा दर मिळतो.

Aloe Vera Farming | Agrowon