Aslam Abdul Shanedivan
तसेच प्रत्येक व्यक्ती औषधी वनस्पतींच्या शोधात असतो. पण प्रत्येकालाच औषधी वनस्पती कळतातच असे नाही.
पण असे एक झाड आहे जे आपल्याला अगदी सहज उपलब्ध होते. तर अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे. याची फळच नाही तर पाने देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
पपई ही आपल्याला अगदी सहज उपलब्ध होते. पपईचे फळ आणि त्याची पाने देखील आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत
पपईच्या हिरव्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 1, प्रोटीन, मॅंगनीज, फॉस्फरस, लोह यांसारखे असंख्य पोषक घटक असतात
तसेच, पपईच्या अर्कामध्ये पॅपेन, किमोपापेन आणि कॅरीकेन हे डेंग्यू तापावर परिणामकारक ठरतात
पपईच्या पाने सेवन केल्याने आपल्या शरीरातील प्लेटलेट्सही वाढतात.
पपई आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असून ते खाल्याने शरीराचे वजन नियंत्रणात राहते आणि हृदय व्यवस्थित काम करते.