Aslam Abdul Shanedivan
धकाधकीच्या जीवनात बदलत्या काळानुसार निरोगी राहण्यासाठी योग्य आहाराबरोबरच चांगली झोप आवशक्य असते.
चांगल्या झोपेसाठी निरोगी पोषण आणि रात्रीचे जेवण देखील गरजेचे असते. ते जर योग्य नसतील तर आरोग्याच्या समस्यांना तोड द्यावे लागते.
त्यामुळे जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर आरोग्याच्या समस्याही टाळायच्या असतील तर रात्री झोपताना काही पदार्थ खाणे टाळणे गरजेचे आहे.
ज्या लोकांना मधुमेह आहे अशा लोकांनी रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी गोड खाणे टाळणे आवश्यक आहे.
रात्री दोन घास अधिक खाण्यापेक्षा दोन घास कमी खाणे गरजेचे आहे. त्यामुळे अपचन, ऍसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ होत नाही.
रात्री झोपण्यापूर्वी फळे खाऊ नका. फळे आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी झोपण्यापूर्वी त्यांचे सेवन केल्यास साखर वाढण्याचा धोका वाढू शकतो.
रात्री चांगली झोप हवी असल्यास झोपण्यापूर्वी मद्यपान करणे टाळा.
रात्री झोपण्यापूर्वी फ्रेंच फ्राईज, कुरकुरीत किंवा पकोडे यांसारखे तळलेले पदार्थ खाल्ल्याने पचनात समस्या निर्माण करतात. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि आम्लपित्त यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.