Anuradha Vipat
बदामाचे तेल हे व्हिटॅमिन ई, फॅटी ॲसिड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे.
कोरड्या, काळ्या पडलेल्या आणि फाटलेल्या ओठांना मऊ आणि गुलाबी बनवण्यासाठी हे तेल अत्यंत फायदेशीर ठरते.
बदामाच्या तेलात ओठांचा नैसर्गिक रंग उजळण्याचे गुणधर्म असतात. काळे पडलेले ओठ नियमित मज्जाजमुळे पुन्हा गुलाबी होऊ लागतात.
ओठांची त्वचा अत्यंत संवेदनशील आणि पातळ असते. बदामाचे तेल ओठांच्या त्वचेमध्ये सहज शोषले जाते आणि ओलावा टिकवून ठेवून ओठांना मऊ व मुलायम बनवते.
हिवाळ्यात किंवा हवामानातील बदलामुळे ओठ फाटणे आणि त्यातून रक्त येणे या समस्येवर बदामाचे तेल एखाद्या नैसर्गिक मलमसारखे काम करते.
केमिकलयुक्त लिप ग्लॉस वापरण्याऐवजी बदामाच्या तेलाचे काही थेंब ओठांवर लावल्यास ओठांना नैसर्गिक चमक मिळते
व्हिटॅमिन ई मुळे ओठांची त्वचा घट्ट राहते. वाढत्या वयानुसार ओठांवर येणाऱ्या सुरकुत्या आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी हे तेल प्रभावी आहे.