sandeep Shirguppe
अळीव हा औषधी पदार्थ असून याचा सर्वाधिक फायदा सांधेदुखीवर होतो.
अळीव बियांमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिनं, फायबर, आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे घटक असतात.
शरीराला उर्जा, उष्णता, आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी अळीव उपयुक्त आहे.
उपाशी पोटी अळीव खाल्ल्यास हाडे मजबूत होतात, विशेष कंबरदुखीवर आराम मिळतो.
अळीवमध्ये असलेल्या लोहतत्वामुळे रक्ताभिसरण सुधारते.
रोज एक चमचा अळीव पाण्यासोबत किंवा गूळासोबत घेतल्यास शरीराला पोषण मिळते.
उपाशी पोटी अळीवचे सेवन केल्यास मांसपेशींमध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत होते.
अळीव खाल्ल्याने थकवा कमी होतो तसेच पचन सुधारण्यास मदत होते.