Anuradha Vipat
एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारची (मिश्र) दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात
वेगवेगळ्या प्रकारची दारू एकत्र प्यायल्यास शरीराला दारू जास्त प्यायली जात आहे हे ओळखायला वेळ लागतो ज्यामुळे जास्त नशा येऊ शकते
मळमळ, ऍसिडिटी, गॅस्ट्रायटीस (पोटदुखी) आणि पोटाच्या भागाला सूज येऊ शकते, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते
वेगवेगळ्या प्रकारची दारू एकत्र प्यायल्यास, यकृतावर जास्त ताण येतो आणि त्याचे गंभीर नुकसान होऊ शकते
जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याने हृदयविकार, अनियमित हृदयाचे ठोके आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने अन्ननलिका, पोट, स्वादुपिंड, यकृत आणि स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने बेशुद्धी येणे, अपघात, हिंसा आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात