Anuradha Vipat
पहिल्या आणि दुसऱ्या मुलामध्ये योग्य अंतर ठेवणे महत्त्वाचे आहे. यामुळे आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
आरोग्याच्या दृष्टीने पहिल्या आणि दुसऱ्या मुलामध्ये किमान 18 ते 24 महिने अंतर असावे
पहिल्या आणि दुसऱ्या मुलामध्ये योग्य अंतर ठेवल्याने अकाली जन्म आणि लहान आकाराच्या बाळाचा धोका टाळता येतो.
योग्य अंतर ठेवल्यास पहिल्या मुलाला पूर्णपणे निरोगी आणि सशक्त होण्यासाठी वेळ मिळतो.
योग्य अंतर ठेवल्यास आईला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार होण्यास मदत होते.
योग्य अंतर ठेवल्यास कुटुंबाचे नियोजन करणे सोपे होते.
प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगवेगळी असते त्यामुळे अंतर ठेवताना डॉक्टरांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणे उत्तम आहे.