Swarali Pawar
अवकाळी पाऊस झाला म्हणून घाबरू नका. आता योग्य नियोजन केलं तर द्राक्ष बाग सुरक्षित ठेवता येते.
बागेतली सुकलेली पाने, फांद्या आणि कुजलेले घड काढून टाका. पाणी साचले असेल तर लगेच निचरा करा.
वेलांना किंवा मण्यांना जखमा झाल्या असतील तर लक्ष द्या. कॉपर ऑक्सिक्लोराइड १ ते १.५ ग्रॅम प्रति लिटर संध्याकाळी फवारणी करा.
तुटलेल्या जागेच्या एक डोळा खाली काप घ्या. पूर्ण काडी खराब असेल तर हलकी खरडछाटणी करा.
पावसानंतर भुरीचा रोग झपाट्याने वाढतो. ट्रायकोडर्मा फवारणी केल्यास रोगावर नियंत्रण मिळते.
लाल कोळी दिसल्यास गंधक धुरळणी ५ ते ६ किलो प्रति एकर करा. यामुळे भुरीवरही काही प्रमाणात नियंत्रण मिळते.
पावसानंतर लगेच पाणी देऊ नका. मणी तडकणे टाळण्यासाठी कायटोसॅन २ मिली प्रति लिटर फवारणी करा.
पावसानंतर निरीक्षण वाढवा आणि हवामानाचा अंदाज पाहत निर्णय घ्या. योग्य व्यवस्थापन केल्यास द्राक्षाचं उत्पादन सुरक्षित राहील.