Rain Impact on Jowar: अवकाळीत ज्वारी वाचवा! योग्य नियोजनाने नुकसान टाळा

Swarali Pawar

अवकाळीचा फटका

राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलाय. ज्वारी पिकाचं नुकसान झालं असलं तरी अजूनही काही उपाय करता येतात.

Sorghum cloudy weather care | Agrowon

पक्व ज्वारीचं काय?

जर ज्वारी पक्वतेच्या अवस्थेत असेल तर हवामानाचा अंदाज पाहून लवकर काढणी करा. झोपलेली ज्वारी वाचवणं कठीण असतं, पण वेळेवर काढणी केल्यास नुकसान कमी होतं.

Sorghum cloudy weather care | Agrowon

साठवण महत्त्वाची

काढणीनंतर ज्वारी स्वच्छ आणि कोरड्या ठिकाणी साठवा. ओलावा राहिला तर दाण्यांची गुणवत्ता घसरते.

Sorghum cloudy weather care | Agrowon

उशिरा पेरलेली ज्वारी

उशिरा लागवड केलेल्या ज्वारीचं नियोजन अजून करता येतं. ढगाळ हवामानात रोगांचा धोका वाढतो, त्यामुळे लक्ष ठेवा.

Sorghum cloudy weather care | Agrowon

ग्रेन मोल्डचा धोका

दमट हवामानात दाण्यांवर पांढरी, गुलाबी किंवा काळी बुरशी दिसते. यामुळे ५०% पर्यंत उत्पादन घटू शकतं.

Sorghum cloudy weather care | Agrowon

स्मट रोग ओळखा

दाणे काळ्या भुकटीत बदलतात, हा स्मट रोगाचा लक्षण आहे. ढगाळ आणि दमट हवामानात त्याचा प्रादुर्भाव वाढतो.

Sorghum cloudy weather care | Agrowon

रोगांवर उपाय

कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. किंवा कार्बेन्डाझिम + मँकोझेब २ ग्रॅम प्रति लिटर वापरू शकता.

Sorghum cloudy weather care | Agrowon

लष्करी अळी नियंत्रण

लष्करी अळी दिसल्यास मेटारायझियम ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करा. वेळीच उपाय केल्यास ज्वारीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाचवता येतं.

Sorghum cloudy weather care | Agrowon

Mango Blossom Drop: ना कीड, ना रोग, तरी आंब्याचा मोहोर का करपतो?

Agrowon
अधिक माहितीसाठी...