Soybean BBF Sowing : रुंद वरंबा सरी लागवड तंत्राने सोयाबीन लागवडीचे फायदे

Team Agrowon

पावसाचे पाणी शेतातून सुरक्षितपणे बाहेर काढणे आणि अधिक पावसाचा पिकांवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने सोयाबीन लागवड करावी.

Soybean BBF Sowing | Agrowon

बीबीएफ पद्धतीमुळे अधिक पावसाच्या वर्षात पीक वाचविण्यात यश आल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. तसेच कमी पाऊस झाल्यास पडणाऱ्या पावसाचे पाणी सरीमध्ये मुरते, त्याचा पीक वाढीसाठी फायदा झाला आहे.

Soybean BBF Sowing | Agrowon

रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे पावसाचे पाणी स­ऱ्यांमध्ये मुरते. मूलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास, तसेच पुढील हंगामातील पिकांस लाभ होतो.

Soybean BBF Sowing | Agrowon

विशेषत: पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो, त्याची तीव्रता कमी होते.

Soybean BBF Sowing | Agrowon

अधिक पाऊस झाल्यास किंवा अधिकचे पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्यास रुंद वरंब्यासोबतच्या दोन्ही बाजूंकडील स­ऱ्यामुळे मदत होते.

Soybean BBF Sowing | Agrowon

चांगली मशागत होऊन वरंबे तयार होतात. हवा खेळती राहून पाणी आणि हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते.

Soybean BBF Sowing | Agrowon

बियाण्याची उगवण चांगली होते. पिकाची पुढील वाढ जोमदारपणे होते. ही पद्धत सर्व कोरडवाहू पिकांसाठी उपयोगी आहे.

Soybean BBF Sowing | Agrowon
आणखी पाहा...