Team Agrowon
प्रत्येक जनावराची वैयक्तिक ओळख असेल तर पालकत्व, जन्मतारीख, उत्पादन नोंदी, आरोग्य इतिहास आणि इतर महत्त्वाच्या व्यवस्थापन माहितीच्या अचूक नोंदी ठेवण्यास मदत होते.
अचूक नोंदी उत्पादकाला वैयक्तिक किंवा संपूर्ण कळपाचा व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध होते.
एखाद्या विशिष्ट जनावराची मालकी दर्शविण्यासाठी किंवा मूळचा कळप सूचित करण्यासाठी जनावराची ओळख महत्त्वाची आहे.
पशुपालक जनावरांचा नोंदी सहज ठेवू शकतात.
मागील नोंदींच्या उपलब्धतेसह जनावरांवर उपचार करण्यात मदत होते.
येणाऱ्या प्रजनन हंगामापूर्वी सहजपणे बदली स्टॉक निवडता येतो. जनावरांवर मालकी प्रस्थापित करता येते.
जनावरांचे वर्तन आणि हालचालींचा मागोवा घेता येतो. विमा दाव्यांसाठी जनावरांची ओळख चिन्हांकित करणे महत्त्वाचे आहे.