Anuradha Vipat
सकाळी योग्य दिनक्रम पाळल्यास पचनसंस्था सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि शरीरातील इम्युन सिस्टीम मजबूत होते.
रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या लोट्यात ठेवलेलं पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकली जातात.
कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केल्यास पचनसंस्था उत्तम राहते.
लिंबू आणि मधासोबत कोमट पाणी घेतल्यास शरीरातील चरबी वितळते आणि शरीर हलकं वाटतं.
योगासने, प्राणायाम किंवा फक्त १० सूर्यनमस्कारही शरीराला ताजेतवाने ठेवतात
सकाळच्या वेळी सकारात्मक विचार करा आणि प्रार्थना करा. ते आपल्या मनाला शांत आणि ऊर्जावान करते.
सकाळचा नाश्ता हा दिवसाचा महत्त्वाचा भाग असतो. पौष्टिक नाश्ता केल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते.